अमळनेर तालुका हादरला : टाकरखेड्यातील दाम्पत्याने दोन चिमुकल्यांसह रेल्वेखाली येत जीवन संपवले


अमळनेर (गुरुवार, 27 ऑगस्ट 2026) : अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा गावातील दाम्पत्याने आपल्या दोन चिमुकल्यांना सोबत घेत कुठल्यातरी धावत्या रेल्वेखाली येत आत्महत्या केली. ही धक्कादायक व तितकीच मन हेलावणारी घटना अमळनेर शहराजवळ गुरुवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे ठोस कारण अद्याप समोर आले नसलेतरी कौटूंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे.

सुनील अमृत भील (26), पार्वती सुनील भील (22), सनी सुनील भील (6) व राज सुनील भील (3) अशी मृतांची नावे आहेत. मयत कुटूंब हे मुळचे राणाईचे येथील रहिवासी असून उदरनिर्वाहासाठी बर्‍याच वर्षांपासून टाकरखेडे येथे रहिवास करीत असल्याचे समजते.




रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या
सूत्रांच्या माहितीनुसार, दाम्पत्याने आपल्या दोन्ही मुलांना पहाटे चार वाजेच्या सुमारास सोबत घेत रेल्वे रूळ गाठला व कुठल्यातरी धावत्या रेल्वेखाली झोकून दिले. रेल्वेच्या जबर धडकेने चौघांच्या शरीराची अवस्था छिन्न-विच्छीन्न झाली व त्यांचा जागीच मृत्यू झाला.

रेल्वे यंत्रणेने स्थानिक पोलिसांना माहिती कळवताच अमळनेर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक गणेश अहिरे, हेड कॉन्स्टेबल संदेश पाटील, विजय भोई, योगेश बागुल, राहुल पाटील यांनी धाव घेत पंचनामा केला तसेच मृतदेह रुग्णालयात हलवण्याची तयारी सुरू केली आहे.

एकाच कुटुंबातील चौघांनी रेल्वेखाली आत्म्हत्या केल्याने टाकरखेडा गावावर शोककळा पसरली. आत्महत्येचे ठोस कारण समोर आले नसलेतरी कौटूंबिक कारणातून ही घटना घडल्याचा अंदाज आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !