यावल शहरासह तालुक्यात तिघांनी उचलले टोकाचे पाऊल

दोघांनी घेतला गळफास तर एकाने विहिरीत घेतली उडी


यावल (मंगळवार, 1 सप्टेंबर 2026) : शहर व तालुक्यातील तिघांनी विविध कारणाने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील रहिवासी व सांगवी खुर्द येथील रहिवाशी अशा दोघा तरुणांनी गळफास घेतला तर दहिगावच्या इसमाने विहिरीत उडी घेतली. या तिघा प्रकरणात यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

काय आहे नेमके प्रकरण ?
यावल शहरातील चोपडा रस्त्यावर इंदिरा गांधी हायस्कूलच्या शेजारील डांगपुरा भागात शेख मुजाहिद शेख मुन्शी मोमीन (39) या तरुणाने गळफास घेतला. हा प्रकार रविवारी रात्री निदर्शनास आला त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी तपासणी करीत मयत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


दुसर्‍या घटनेत सांगवी खुर्द या गावातील रहिवासी प्रमोद श्रावण गोसावी (41) यानेदेखील आपल्या पायाच्या आजाराला कंटाळून वायरच्या साह्याने गळफास घेतला. त्यालाही ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले.

तिसर्‍या घटनेत दहिगावातील नरेंद्र उर्फ ज्ञानबा यादव पाटील (36) यांनी व्यसन सोडवून आणले मात्र मानसिक संतुलनावर परिणाम झाल्यानंतर ते बेपत्ता झाले असतानाच सोमवारी दुपारी शेत विहिरीत त्यांचा मृतदेह आढळला. तिन्ही घटनेप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीरक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमित तडवी, पोलीस हवालदार उमेश महाजन, पोलीस नाईक वसीम तडवी करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !