यावल शहरात चक्कर येवून कोसळल्याने सलून कारागीराचा मृत्यू
यावल (सोमवार, 7 सप्टेंबर 2026) : यावल शहरातील फैजपूर रस्त्यावर केश कर्तनालय दुकानात काम करणार्या तरुणाचा चक्कर येवून कोसळल्याने मृत्यू झाला. देवानंद दगडू सोनवणे (45) असे मृत तरुणाचे नाव आहे.
देवानंद या तरुणास रविवारी दुपारी अचानक चक्कर आल्याने तो जमिनीवर कोसळला. हा प्रकार निदर्शनास येताच नागरीकांनी धाव घेतली. तत्काळ पोलिसांना माहिती देत तरुणाला यावल ग्रामीण रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मयत घोषीत केले. मयत तरुण अविवाहित होता व तो रायपूर, ता.रावेर येथील मुळचा रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. यावल शहरातील बहिणीकडे बारीवाडा भागात हा तरुण वास्तव्यास असल्याचे सांगण्यात आले.

