चार हजारांची लाच मागणी अंगलट ; कापूरवाडी मंडळाधिकारी एसीबीच्या जाळ्यात


अहिल्यानगर (मंगळवार, 8 सप्टेंबर 2026) : चार हजारांच्या लाच मागणी प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील कापूरवाडी मंडळाधिकारी संगीता नारायण पुंड (ईएमई कॉलनी, अहिल्यानगर) यांना अहिल्यानगर एसीबीने अटक केली आहे.

असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार 58 वर्षीय पुरूष असून त्यांच्या बुर्‍हाणनगर येथील गट क्रमांक 6, प्लॉट क्रमांक 49 मधील 475 चौ.मी. क्षेत्रापैकी 210.90 चौ.मी. क्षेत्राची खरेदी करण्यात आली होती. या खरेदीसंदर्भातील नोंद फेरफार क्रमांक 6802 अन्वये सातबारा उतार्‍यावर झालेली नोंद संगणकीकृत करण्याचे काम प्रलंबित होते. 8 डिसेंबर 2025 रोजी तहसीलदारांकडे अर्ज केल्यानंतर तो मंडळ अधिकारी संगीता पुंड यांच्याकडे आला व त्यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने एक हजार रुपये दिले मात्र उर्वरित चार हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याने तक्रार नोंदवण्यात आली व सापळा रचण्यात आला मात्र संशय आल्याने सापळा यशस्वी झाला नाही.

एसीबीकडे लाच मागणीचा अहवाल येताच मंगळवारी या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 462/2026 दाखल करण्यात आला व संशयीताला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक छाया देवरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचारासंदर्भात माहिती असल्यास नागरिकांनी 1064 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !