भुसावळात ब्राह्मण समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा 27 रोजी सन्मान सोहळा : विप्र कुटुंबकमकडून आयोजन
भुसावळ (गुरुवार, 24 सप्टेंबर 2026) : तिवारी फाउंडेशन संचलित ‘विप्र कुटुंबकम’ समूहाच्या वतीने ब्राह्मण समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा रविवार, 27 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 10.30 ते 12.30 या वेळेत भगवान श्री परशुराम मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी बुधवार, 23 सप्टेंबर रोजी महागणपती मंदिर, रामायण नगरात विप्र कुटुंबकमच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधणे, विद्यार्थ्यांची गुणपत्रिका संकलित करणे, सोशल मीडिया, दूरध्वनी तसेच वैयक्तिक भेटीच्या माध्यमातून समाजबांधवांना निमंत्रित करणे यासह कार्यक्रमाच्या विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
या बैठकीस तिवारी फाउंडेशन व विप्र कुटुंबकमचे संस्थापक अध्यक्ष आशिष शशिकांत तिवारी, कार्यकारी अध्यक्ष डॉ.अंशुमन मिश्रा, पंडित दीपक पाथरकर, पंडित जयप्रकाश शुक्ला, शशिकांत तिवारी, प्रसाद कुलकर्णी, शारदाप्रसाद पांडे, कैलाश पांडे, हरेंद्र शुक्ला, शिवराम वाजपेयी, मोहन जोशी, सोमदत्त तिवारी, अशोक उपाध्याय, माधव प्रसाद तिवारी, उमाकांत शर्मा, नितीन शर्मा, वैष्णवी तिवारी, अश्विनी कुलकर्णी व सोनल शर्मा आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना गुणपत्रिका पाठविण्याचे आवाहन
संस्थापक अध्यक्ष आशिष तिवारी यांनी समाजबांधवांना आपल्या गुणवंत पाल्यांची गुणपत्रिका संबंधित प्रतिनिधींमार्फत व्हॉट्सपद्वारे विप्र कुटुंबकमपर्यंत पाठविण्याचे आवाहन केले. 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता भगवान श्री परशुराम मंदिर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवावे आणि ब्राह्मण समाजाच्या सशक्तीकरणाच्या उपक्रमाला पाठबळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.



