स्पर्धा परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास : भुसावळात प्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे
भुसावळ (गुरुवार, 24 सप्टेंबर 2026) : शहरातील कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या वतीने हिंदी दिनानिमित्त ‘हिंदी सप्ताहाचे ’ आयोजन करण्यात आले. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे होते. स्पर्धा परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असल्याचे यावेळी ते म्हणाले.
यांची होती उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ.जी.आर.वाणी, हिंदी विभागप्रमुख तथा उपप्राचार्य डॉ.डी.एन.पाटील होते. अर्थशास्त्र विभागाचे प्रा.डॉ.जितेंद्र आडोकार, मराठी विभागाच्या डॉ.किरण समर्थ परीक्षक होते. सूत्रसंचालन डॉ.राजेंद्र तायडे यांनी केले.

असा आहे स्पर्धांचा निकाल
सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम- ज्ञानेश्वरी कोळी, द्वितीय- हेमलता चौधरी, निबंध स्पर्धा प्रथम- उर्मिला पाचपांडे, द्वितीय- हेमलता चौधरी, पोस्टर स्पर्धा- प्रथम- मोक्षदा जंगले, प्रतीक्षा कासार, हिंदी व्याकरण स्पर्धा- प्रथम- श्वेता जवरे, द्वितीय- कामिनी सपकाळ
यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे, उपप्राचार्य डॉ.जी.आर.वाणी, उपप्राचार्य व हिंदी विभागप्रमुख प्रा.डॉ.डी.एन.पाटील यांच्याहस्ते विद्यार्थांना बक्षीस देण्यात आली. डॉ.मनोज पाटील यांनी आभार मानले. यावेळी डॉ.वंदना महाजन, प्रा.सुनील अडकमोल, विभागातील प्रा.डॉ. मनोज पाटील, प्रा.डॉ.राजेंद्र तायडे, डॉ.प्रियांका महाजन आदी उपस्थित होत्या.



