भुसावळ रेल्वे स्थानकावरील पाच अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई
भुसावळ (गुरुवार, 24 सप्टेंबर 2026) : मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाकडून स्थानकांवर होणारी अनधिकृत वेंडिंग तसेच रेल्वे नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी नियमितपणे तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने प्राप्त तक्रारीच्या आधारे गुरुवार, 24 रोजी भुसावळ स्थानकावर सहायक वाणिज्य व्यवस्थापक (टीसी) पी.के.सिंह यांनी वाणिज्य व आरपीएफ कर्मचार्यांच्या संयुक्त पथकाद्वारे अचानक तपासणी केली. यावेळी 9 विक्रेत्यांविरुद्ध रेल्वे नियमांमधील लागू तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली. चार अधिकृत कार्डधारक विक्रेते निर्धारित नियमांचे उल्लंघन करून ट्रॉलीच्या माध्यमातून वेंडिंग करताना आढळले तर पाच अनधिकृत विक्रेते आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
दंडात्मक कारवाई
चार विक्रेत्यांवर रेल्वे अधिनियमाच्या कलम 144 अंतर्गत नियमानुसार कारवाई करीत आठ हजारांचा दंड वसूल करण्यात आला तर पाच अनिधिकृत विक्रेत्यांकडून रेल्वे अधिनियमाच्या कलम 144 व 147 अंतर्गत कारवाई 12 हजार 500 दंड वसूल करण्यात आला.

अनधिकृत विक्रेत्यांबाबत करा तक्रार
भुसावळ विभागाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, त्यांनी केवळ अधिकृत विक्रेत्यांकडूनच खाद्यपदार्थ व इतर वस्तू खरेदी कराव्यात तसेच कोणत्याही प्रकारची अनधिकृत वेंडिंग किंवा रेल्वे नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास त्याची माहिती रेल्वेच्या अधिकृत तक्रार निवारण माध्यमांद्वारे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावी. प्रवाशांकडून प्राप्त होणार्या तक्रारी व माहितीच्या आधारे आवश्यक तपासणी करून नियमानुसार कारवाई करण्यात येईल.



