भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात एनएसएस स्थापना दिवस उत्साहात
भुसावळ (गुरुवार, 24 सप्टेंबर 2026) : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची भावना, सामाजिक बांधिलकी, स्वयंसेवावृत्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक होते. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.जे.बी.चव्हाण, डॉ.अनिल सावळे, प्रा.संगीता धर्माधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्यांनी केले मार्गदर्शन
प्रास्ताविक डॉ.ए.आर.सावळे यांनी केले. प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व स्पष्ट केले. शिक्षणासोबतच समाजाशी असलेली आपली बांधिलकी जपणे आणि समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे ही विद्यार्थ्यांची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रम अधिकारी डॉ.जे.बी.चव्हाण, डॉ.अनिल सावळे, प्रा.संगीता धर्माधिकारी यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा.गायत्री नेमाडे तर आभार प्रा.संगीता धर्माधिकारी यांनी मानले. कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी, एनएसएस स्वयंसेवक सहभागी झाले होते.




