भुसावळात 1 ते 5 ऑक्टोबदरम्यान वारली चित्रकला प्रशिक्षण शिबिर
भुसावळ (सोमवार, 28 सप्टेंबर 2026) : दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर. संस्कृती मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने शहरात वारली चित्रकला प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शहरातील ब्राह्मण संघात 1 ते 5 ऑक्टोबर 2026 दरम्यान रोज सायंकाळी पाच ते सहा या वेळेत हे शिबिर विनामूल्य होणार आहे.
शिबिरात लागणारे सर्व साहित्य प्रशिक्षणार्थींना पुरवण्यात येईल तसेच शिबिर पूर्ण करणार्याला प्रमाणपत्र देण्यात येईल. या शिबिरात भुसावळ येथील प्रसिद्ध चित्रकार रमाकांत भालेराव हे मार्गदर्शन करतील. सर्व कलाप्रेमी नागरिकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
