राष्ट्रीय एकात्मता ही लोकशाहीची महत्त्वाची शक्ती : प्राचार्य प्रा.राजेंद्र वाघुळदे
भालोद (सोमवार, 28 सप्टेंबर 2026) : आपल्या देशातील राष्ट्रीय एकात्मता हा लोकशाहीचा महत्त्वाचा घटक आहे. जात, धर्म आणि पंथ यांना एकत्र गुंफून ठेवण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता हा महत्त्वाचा मुद्दा आहे, असे प्रतिपादन धनाजी नाना चौधरी महाविद्यालय, फैजपूरचे प्राचार्य प्रा.राजेंद्र वाघुळदे यांनी केले. सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी ‘राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते.
प्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य प्रा. राजेंद्र वाघुळदे, प्राचार्य प्रा. डॉ. संजय भोळे,प्राचार्य प्रा.किशोर कोल्हे,प्रा डॉ.दिनेश पाटील,कार्यशाळा समन्वयक प्रा.डॉ.सुनिल नेवे हे उपस्थित होते.
कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा, विविधतेतील एकता, संविधानिक मूल्ये आणि राष्ट्रीय जबाबदारी यांविषयी जागरूकता निर्माण करणे हा होता. कार्यशाळेत एकूण 130 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.कार्यशाळेचे उद्घाटन धनाजी नाना चौधरी महाविद्यालय, फैजपूरचे प्राचार्य प्रा. राजेंद्र वाघुळदे यांच्या शुभहस्ते झाले.
कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात धनाजी नाना चौधरी महाविद्यालय, फैजपूरचे प्राचार्य प्रा.राजेंद्र वाघुळदे यांनी सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर दुसर्या सत्रात शेंदुर्णी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. संजय भोळे यांनी राष्ट्रीय एकात्मतेची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी भारतीय संविधानाचे वाचन करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.राष्ट्रीय एकात्मता हि काळाची गरज आहे.जात धर्म आणि पंथ यांना जोडणारी ताकद तुम्हा युवकांमध्ये आहे असे त्यांनी सांगितले.या प्रसंगी त्यांनी राष्ट्रीय एकात्मता विषयी दोन भावनिक कविता सादर केल्या.
तिसर्या सत्रात भुसावळ येथील कीर्तनकार दीपक पाटील (महाराज) यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मतेच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले. कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन होते आणि त्याचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होतो. व्यसनाधीनता हा एक शाप असून विद्यार्थ्यांनी त्यापासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
समारोप सत्रात पु.ओ.नाहाटा महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.आर.एस.नाडेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेच्या माध्यमातून देशाचा एक चांगला आदर्श नागरिक घडण्यास मदत होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत ग्रंथ देऊन करण्यात आले. प्रसंगी धनाजी नाना चौधरी महाविद्यालय, फैजपूरचे प्राचार्य प्रा. राजेंद्र वाघुळदे आणि शेंदुर्णी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. संजय भोळे यांना महाराष्ट्र शासनातर्फे ‘उत्कृष्ट प्राचार्य’ म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. किशोर कोल्हे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यशाळेत सहभागी झालेल्या कोमल तायडे (भालोद महाविद्यालय), श्वेता भालेराव (फैझपूर महाविद्यालय), सोपान गवळे (भालोद महाविद्यालय) या विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात कार्यशाळेबद्दलची आपली मते मांडली. कार्यशाळेचे समन्वयक डॉ. सुनील नेवे यांनी प्रास्ताविक तसेच समारोप सत्राचे सूत्रसंचालन केले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन प्रा. मोहिनी तायडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. मीनाक्षी वाघुळदे यांनी केले. आभार प्रा.डॉ.दिनेश पाटील यांनी मानले.
यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
प्राचार्य प्रा.किशोर कोल्हे, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे समन्वयक डॉ. दिनेश पाटील, कार्यशाळा समन्वयक प्रा.डॉ.सुनील नेवे, प्रा.डॉ.जतीनकुमार मेढे, प्रा.डॉ.पद्माकर सावळे, प्रा.डॉ.मीनाक्षी वाघुळदे, प्रा.मोहिनी तायडे, प्रा. वसंतराव पवार, प्रा.हेमंत इंगळे, महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचार्यांनी सहकार्य केले. प्रा.डॉ.अजयकुमार कोल्हे, प्रा.चंद्रकांत वानखेडे,प्रा.काशिनाथ पाटील, प्रा.डॉ.गणेश चौधरी, प्रा.डॉ.राकेश चौधरी, प्रा.डॉ.आशुतोष वर्डीकर, प्रा.डॉ.दिनेश महाजन, प्रा.निलेश पाटील, प्रा गीतांजली चौधरी, प्रा.हंसिका महाजन, प्रा फाल्गुनी महाजन, प्रा.जान्हवी परतणे, प्रा.मानसी महाजन, प्रा.भावना प्रजापती, प्रा.कोमल सावळे आदींनी परिश्रम घेतले.
