भुसावळातील भोळे महाविद्यालयास आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग पुरुष स्पर्धेत जनरल चॅम्पियनशिप
भुसावळ (सोमवार, 28 सप्टेंबर 2026) : जळगाव विभाग क्रीडा समिती अंतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग पुरुष स्पर्धेत दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करीत 2026-27 ची जनरल चॅम्पियनशिप पटकावली.
या खेळाडूंनी मिळवले यश
ही स्पर्धा जळगावातील नूतन मराठा महाविद्यालयात पार पडली. स्पर्धेत भोळे महाविद्यालयाच्या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विविध वजन गटांत विजय मिळविला. त्यात सार्थक सोनवणे 47 ते 50 किलो वजन गट, हर्षल गोपाल बार्हे 65 ते 70 किलो वजन गट व गौरव गोपाल बार्हे 80 ते 85 किलो वजन गट.
यशस्वी खेळाडूंचा गौरव
या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजू फालक यांच्याहस्ते यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी क्रीडा संचालक प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.डॉ.जयश्री भंगाळे, प्रा.डॉ.जगदीश चव्हाण यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. यशस्वी खेळाडूंची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आंतरविभागीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धा धरणगावात होतील.
