भारत-चीन सीमेवर गोळीबारात चीनचे पाच जवान ठार
नवी दिल्ली : लडाखमधील भारत-चीन सीमेवर दोन्ही सैन्यांत झालेल्या गोळीबारात चीनचेही पाच जवान ठार झाल्याचे सांगण्यात आले. सीमेवरील तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांचे लष्करी अधिकारी प्रयत्न करत आहेत. यावर चीनने भारतावर गंभीर आरोप केले असून भारतीय सैनिकांनीच दोनदा चीनची हद्द ओलांडल्याचा दावा केला असून भारतीय सैनिकांनीच आधी चीनच्या सैनिकांना आक्रमणासाठी चिथावणी दिल्याचे म्हटले आहे. दरम्यान, चीनने केलेल्या गोळीबारात भारतीय सैन्याचे तीन जवान शहीद झाल्याची माहिती दिली आहे. भारत-चीन सीमेवरील गलवान खोर्यात ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.