भुसावळात 15 नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय कोळी समाज वधू-वर परिचय मेळावा
भुसावळ (शनिवार, 14 नोव्हेंबर 2026) : विवाह इच्छुक युवक-युवतींना विवाहासाठी योग्य जोडीदार निवडण्याची संधी उपलब्ध व्हावी, तसेच समाजातील कुटुंबांना एकत्र आणून सामाजिक ऋणानुबंध अधिक दृढ व्हावेत, या उद्देशाने कोळी समाज विकास मंडळ, भुसावळतर्फे राज्यस्तरीय कोळी समाज वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मेळावा रविवार, 15 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता गजानन महाराज नगर येथील कोळी समाज मंगल कार्यालय, भुसावळ येथे पार पडणार आहे.
या मेळाव्यात विवाह इच्छुक वधू-वरांना आपला परिचय करून देण्याची संधी मिळणार असून, पालकांनाही योग्य स्थळ निवडण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. तरी विवाह इच्छुक वधू-वरांनी, त्यांच्या पालकांनी तसेच समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सामाजिक उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोळी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे तसेच राज्यस्तरीय कोळी समाज वधू-वर मेळाव्याचे अध्यक्ष संदीप कोळी, दीपक सोनवणे आणि चंद्रकांत सूर्यवंशी यांनी हे आवाहन केले आहे.