उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतर्फे भुसावळ तालुक्यात गरीब गरजूंना दिवाळीचा शिधा वाटप
बोहर्डी, काहूरखेडा, पिंपळगाव, साकरी, साकेगाव, कुर्हा, वराडसीम, किन्हीतील शेतकरी गरजूंना पदाधिकार्यातर्फे गावागावात वाटप
वरणगाव (शनिवार, 21 नोव्हेंबर 2026) : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून दुष्काळाचे सावट असलेल्या महाराष्ट्रात गरीब, गरजू, अपंग, विधवा, लाडक्या बहिणी तसेच शेतकरी बांधवांना दिवाळी अंधारात न जाता त्यांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने राज्यातील 232 प्रत्येक तालुक्यात शिवसेनेच्या पदाधिकार्यातर्फे हा शिधा वाटप केला जात आहे.
टीम तयार करीत शिधा वाटप
शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ तालुका विधानसभा क्षेत्रातील जिल्हा परिषद गट निहाय शिवसेनेच्या पदाधिकार्यांची टीम तयार करून गावात जाऊन हा शिधा वाटप करण्यात आला. यामध्ये भुसावळ तालुक्यातील बोहर्डी, काहूरखेडा. पिंपळगाव, बेलखेडा, किन्ही, सुनसगाव, किन्ही, साकरी, साकेगाव, कंडारी या गावात दिवाळीचा शिधा वाटप करण्यात आला. उर्वरीत गावातदेखील येत्या दोन-तीन दिवसात शिधा वाटप करण्यात येणार आहे.
यांची होती उपस्थिती
दिवाळीचा शिधा वाटप करतेवेळी शिवसेनेचे पदाधिकारी ज्येष्ठ शिवसैनिक विलास मुळे, भुसावळ विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष माळी, तालुकाप्रमुख निलेश ठाकूर, तालुका संघटक सुभाष चौधरी, वरणगाव नगरपरिषद गटनेत्या तृप्ती महाजन, नगरसेवक राजेंद्र चौधरी, विनोद झोपे, माजी सभापती राजेंद्र चौधरी, नारायण कोळी, जितेंद्र नागपुरे, शैलेंद्र ठाकरे, हमीदभाई, महिला जिल्हाप्रमुख नंदा निकम, उपजिल्हाप्रमुख सविता माळी, तालुकाप्रमुख रेखा देशमुख, मनिषा पाटील, वर्षा तलारे, दिशा महाजन, श्रद्धा बेदरकर, अल्प संख्याक तालुकाप्रमुख पप्पू जकातदार, उप जिल्हासंघटक उल्हास भारसके, उप सरपंच किशोर कोळी, आचेगाव ग्रा.पं.चे माजी सदस्य अक्षय बेंडाळे, काहूरखेडा सरपंच विनोद पाटील, बोहर्डीचे सर्वेश पाटील, सागर वंजारी यांच्यासह गावगावचे शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.
