जवखेडा येथील वयोवृद्धाने उचलले टोकाचे पाऊल


अमळनेर (बुधवार, 25 नोव्हेंबर 2026) : अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथील मंडाबाई बाबुराव माळी (75) या वृद्ध महिलेने स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेतला. टोकाचे पाऊल वृद्धेने का उचलले ? याचे कारण कळू शकले नाही.

महिलेचा पुतण्या व पोलीस पाटील यांच्या मदतीने वृद्धेला खाली उतरवून ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हेड कॉन्स्टेबल काशिनाथ पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !