माजी विद्यार्थी मंडळ, विद्यार्थी सहाय्यक समिती, पुणे’ च्या ‘भडगाव संपर्क केंद्राचे गोंडगाव शाळेत उद्घाटन


भडगाव (बुधवार, 25 नोव्हेंबर 2026) : विद्यार्थी सहाय्यक समिती, पुणे यांच्या माजी विद्यार्थी मंडळाचे संपर्क केंद्राचे उदघाटन गोंडगाव मराठी शाळा, माध्यमिक विद्यालय , बांबरुड प्र. ब. येथे मोठया उत्साहात झाले. अध्यक्षस्थानी गोंडगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.जी.नन्नावरे होते.

यांची होती उपस्थिती
गोंडगाव गावाचे लोकनियुक्त सरपंच राहुल पाटील, विकास मंच सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बांबरुड प्र. ब गोंडगाव माध्यमिक विद्यालय, गोंडगाव मराठी जिल्हा परीषद शाळेमार्फत समितीच्या पदाधिकार्‍यांसह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व समितीच्या पदाधिकार्‍यांचे वृक्ष लागवडीसाठी अनमोल सहकार्याबद्दल आभार मानण्यात आले. तसेच आपली समिती वृक्ष लागवडीच्या अनमोल कार्यासह इतर विदयार्थ्यांच्या हिताचे कार्यक्रम राबवुन विदयार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत प्रगतीचे शिखर गाठण्याचे ध्येय गाठण्यासाठी ही समिती अनमोल काम करीत असल्याचे उपस्थित शाळांचे पदाधिकारी व मान्यवरांनी सांगितले. विद्यार्थी सहाय्यक समितीची माहिती ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी हा मुख्य उद्देश हे केंद्र स्थापन करण्यामागचा असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष गणेश काळे यांनी दिली.

1956 साली पुण्यामध्ये विद्यार्थी सहाय्यक समितीची स्थापना 
ग्रामीण भागातील गरीब, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये उच्च शिक्षणासाठी अल्प दरात निवास, भोजन यांसह व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध उपक्रम, शिक्षणानंतर नोकरी व्यवसायासाठी मार्गदर्शन समितीतर्फे राबविण्यात येत आहे, अशी माहितीही देण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी मंडळाचे खजिनदार अ‍ॅड.देविदास टिळे, सभासद सीए संतोष घारे, क्षेत्रीय वन अधिकारी नीलम महाडिक, दीपक मराठे, केंद्रप्रमुख नरेंद्र जयसिंग परदेशी, मच्छिंद्र शार्दुल, ललित मांडोळे, सतीश पाटील, राहुल सोनार, रतीलाल पाटील, भिकन परदेशी, भावलाल परदेशी, रविंद्र परदेशी, शरद परदेशी, कर्तार परदेशी, ओम पाटील, दीपक परदेशी, प्रतीक्षा परदेशी यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

मंडळाच्या वतीने माध्यमिक विद्यालय गोंडगाव’ येथे 100 देशी वृक्ष लावण्यात आले, त्यांचे वृक्षपूजन समितीच्या माजी विद्यार्थिनी, क्षेत्रीय वन अधिकारी नीलम महाडीक व बांबरुड प्र. ब येथील रामकोरबाई जयसिंग परदेशी यांच्याहस्ते करण्यात आले. वृक्ष संगोपन प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला व पाण्यासाठी ठिबक सिंचन यंत्रणा कामाचा शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाची व्यवस्था सैंदाणे ,जितु पाटील, अक्षय परदेशी, सौरभ परदेशी व अपेक्षा परदेशी यांनी पाहिली. सूत्रसंचालन गोंडगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक मुख्याध्यापक बी.जी.नन्नावरे यांनी केले . लोकनियुक्त सरपंच राहुल पाटील व विकास मंच सदस्य शशिकांत मराठे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !