भडगावात पेट्रोल पंपावर कोयता दाखवून मोबाईलची लूट : आरोपी जाळ्यात
भडगाव (शनिवार, 28 नोव्हेंबर 2026) : पेट्रोल पंपावर आलेल्या एका व्यक्तीला शस्त्राचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाईल बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना भडगावात घडली. या प्रकरणी संशयीत आरोपी विशाल संजू सोनवणे (22, रा.भडगाव) यास अटक करण्यात आली.
काय आहे प्रकरण ?
भडगावातील ए.बी.पेट्रोलियम पंपावर गुरुवार, 26 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री सुमारे 8.45 वाजेच्या दरम्यान फिर्यादी अरुण शेनपडू पाटील (48, एकविरा नगर, भाग 2, भडगाव) हे पेट्रोल पंपावर असताना आरोपीने त्यांच्याजवळ येऊन कोयत्याचा दाखविला. त्यानंतर फिर्यादीचा सुमारे 10 हजार रुपये किंमतीचा रियलमी कंपनीचा आकाशी रंगाचा मोबाईल बळजबरीने हिसकावून आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.
या घटनेनंतर फिर्यादी यांनी भडगाव पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक 312/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत संशयित आरोपी विशाल संजू सोनवणे याला अटक केली.
