जळगाव आर्थिक गुन्हे शाखेचा उत्तम कडलग यांनी स्वीकारला पदभार


जळगाव : जळगाव आर्थिक गुन्हे शाखेचा उत्तम कडलग यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांनी त्यांचे बुके देवून स्वागत केले. यापूर्वी कडलग हे चाळीसगाव येथे उपअधीक्षक म्हणून कार्यरत होते. नुकत्याच झालेल्या बदल्यांमध्ये त्यांची जळगाव आर्थिक गुन्हे शाखेत बदली झाली होती. जळगाव आर्थिक गुन्हे शाखेत अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल असून आरोपींना अटक करण्याचे आव्हान नूतन उपअधीक्षक कडलग यांच्यापुढे असणार आहे.

मुक्ताईनगर उपअधीक्षकांनीही स्वीकारला पदभार
मुक्ताईनगरला उपअधीक्षकपदी नाशिक ग्रामीणमधून बदलून आलेल्या सुरेश जाधव यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.


कॉपी करू नका.