तळवेलला ग्रामपंचायतीच्या माजी महिला सदस्यांची आत्महत्या


वरणगाव- येथून जवळच असलेल्या तळवेल येथील रहिवासी व ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या शिल्पा नितीन पाटील (39) राहत्या घराझ:ज्ञ पत्री शेडच्या अँगलला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारह सकाळी साडेआठ वाजता उघडकीस आली. शिल्पा पाटील यांनी आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही. चंद्रकांत देवीदास पाटील (तळवेल) यांनी वरणगाव पोलिसात दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास एएसआय नरसिंग चव्हाण करीत आहेत.


कॉपी करू नका.