खंडवा रेल्वे स्थानकाचे डीआरएम यांनी केले निरीक्षण


भुसावळ : भुसावळ विभागाचे डीरआरएम विवेककुमार गुप्ता यांनी विभागातील सर्व शाखा अधिकार्‍यांसह भुसावळ विभागातील खंडवा स्थानकाचे निरीक्षण केले. या निरीक्षणत स्थानक निरीक्षणासह बाहेरील परीसर आणि खंडवा माल गोदामाची पाहणी केली.

गुप्ता यांनी केल्या विविध सूचना
माल गोदामात सामान आणणे व परत घेऊन जाणार्‍या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी सुचना देण्यात आली. माल गोदामातील गेटचे काम आणि ट्रकला येण्या जाण्यासाठीचा पक्का मार्ग जुना 8 मीटरचा रोड हा 10 मीटर रुंदी वाढविण्यासंबंधी सूचना देण्यात आली. या पाहणीत वरीष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आर.के.शर्मा, वरीष्ठ विभागीय अभियंता (समन्वय) राजेश चिखले, वरीष्ठ विभागीय अभियंता (उत्तर) निसितकुमार मल, जनसंपर्क अधिकारी जीवन चौधरी, मुख्य वाणिज्य निरीक्षक (खंडवा)एन.के.शर्मा व अधिकारी तथा सर्व कर्मचारी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !