माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर किरकोळ जखमी


भुसावळ : माजी खासदार स्व.हरीभाऊ जावळे यांचे निधन झाल्यानंतर सांत्वनासाठी निघालेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील वाहनाला नशिराबादनजीक अपघात झाल्याने विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर किरकोळ जखमी झाले. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली.

वाहनाचे नुकसान : दरेकर किरकोळ जखमी
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे बुधवारी जळगाव येथून भालोद येथे जात असताना नशिराबाद-भुसावळ दरम्यान असलेल्या उड्डाणपुलाजवळ विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वाहनाला मागील वाहनाचे धडक बसल्याने दरेकर किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात आले. अपघाताची नोंद झाली नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !