नववी-दहावीसह बारावीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके द्यावीत


मुख्यमंत्र्यांसह शालेय शिक्षण मंत्र्यांकडे मंगेश पाटील यांची मागणी

भुसावळ : कोरोना महामारीमुळे राज्यातील अनेकांच्या हाताचे काम गेले असून ते आज जीवन जगण्यासाठी संघर्ष करत आहे तसेच गत वर्षी आलेल्या वारंवार आपत्तीमुळे शेतकरीही हवालदिल झालेला आहे. अशा परीस्थितीत शेतकरी व मजुरी करणार्‍या पालकांच्या विद्यार्थ्यांना सत्र 2020 व 21 मध्ये पाठ्यपुस्तके व लेखन साहित्य कसे विकत घ्यावे ? हा मोठा प्रश्‍न उभा ठाकला आहे. शासनाने या कठीण प्रसंगी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता इयत्ता नववी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके व लेखन साहित्य देऊन न्याय द्यावा, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष व सुरत्न फाउंडेशनचे जळगाव अध्यक्ष मंगेश सुभाष पाटील यांनी केली आहे. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनाही पाठवण्यात आली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !