रावेरात किराणा सामानावर चोरट्यांचा डल्ला


रावेर : शहरातील मदिना कॉलनीत किराणा दुकानातून चोरट्यांनी किराणा सामानावर डल्ला मारल्याची गुरुवारी उघडकीस आली. चोरट्यांनी पाच हजार 420 रुपयांच्या जीवनावश्यक साहित्याची चोरी केल्याप्रकरणी रावेर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्या आला. अज्ञात चोरट्याने 450 रुपये किमतीचे पॅराशूट तेल, 300 रुपय किंमतीचे व्हिल साबण , 150 रुपये किंमतीचे बिस्किट, एक हजार 200 रुपयांचे बीडी बंडल, 150 रुपयांचा शेव-चिवडा, 100 रुपये किमतीचा आम-आचार, 70 रुपयांचा आग्रा पेठा मिठाई तसेच तीन हजारांची रोकड पाच हजार 420 रुपयाच्या साहित्यावर डल्ला मारला. रावेर पोलिसात दुकानदार शाहरुख खान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास महेंद्र सूरवाडे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !