वाघूर नदीपात्रात पाय निसटल्याने साकेगावातील 39 वर्षीय इसमाचा मृत्यू


साकेगाव : साकेगाव येथील वाघूर नदीपात्रात शौचास गेलेल्या विनोद सुनील सोनवणे (39, साकेगाव) याचा पाय निसटल्याने नदीपात्रात बुडाल्याने मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी ही घटना घडली. भुसावळ तालुका पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक निरीक्षक अमोल पवार, विजय पोहेकर यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी साकेगाव गाठून पंचनामा केला. या प्रकरणी किशोर निवृत्ती सोनवणे (साकेगाव) यांच्या खबरीनुसार तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास नाईक विजय श्रावण पोहेकर करीत आहेत. दरम्यान, सोमवारी महामार्ग चौपदरीकरण कामावरील वेल्डिंग सेक्शनमधील कामगार लालबाबू पंडित (45, न्यू दिल्ली) यांचा नदीपात्रात पाणी घेण्यासाठी गेल्यानंतर नदीपात्रातील पाईपात अडकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा गुरुवारी ही घटना घडल्याने साकेगावात हळहळ व्यक्त करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !