भुसावळात तरुणावर गोळीबार : सात आरोपींविरुद्ध गुन्हा


आरपीडी रस्त्यावर अज्ञात कारणावरून तरुणावर गोळी झाडत फायटरने केली मारहाण

भुसावळ : शहरातील आरपीडी रोडवरील मुस्लीम कब्रस्थानाजवळ किरकोळ कारणावरून 19 वर्षीय तरुणावर गोळी झाडून फायटरने मारहाण झाल्याची घटना गुरुवारी रात्री साडेसात ते साडेआठ वाजेच्या सुमारास घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली होती. गोळीबारात आदित्य संजय लोखंडे (19, न्यू आंबेडकर नगर, भुसावळ) हा तरुण जखमी झाला होता तर त्यास गोदावरी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले होते. सुरुवातीला गोळीबार झाला वा नाही? याबाबत संभ्रम होता मात्र जखमीचे रात्री उशिरा सीटीस्कॅन व वैद्यकीय अहवालानंतर गोळीबार झाल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणी रात्री सात संशयीताविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

आरोपींच्या शोधार्थ पथक रवाना
आरोपींनी केलेल्या गोळीबारात गोळी तरुणाच्या कानाला, डोक्ययाला लागली असून तरुणाच्या हातालाही दुखापत झाली आहे. गोळीबाराची माहिती कळताच शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व सहकार्‍यांनी घटनास्थळ गाठले. शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विनोदकुमार गोसावी यांनी गोदावरी रुग्णालयात जावून जखमींकडून हल्ल्याबाबत माहिती जाणून घेतली. संशयीत आरोपींनी जखमीची दुचाकी तसेच मोबाईलदेखील लांबवला आहे. तपास सहा.निरीक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !