आठ पोलिसांची हत्या करणारा कुविख्यात गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटरमध्ये ठार
लखनऊ : कुविख्यात म्हणून ख्याती असलेला व आठ पोलिसांची हत्या करून चर्चेत आलेला कानपूरमधील गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटरमध्ये शुक्रवारी सकाळी ठार झाला आहे. दुबेला उज्जैनमध्ये अटक करून कानपूरला एसटीएफ पथक नेत असताना वाहन पलटी झाल्यानंतर दुबेने पोलिसांकडून बंदूक हिसकावत पळ काढला मात्र यावेळी झालेल्या फायरींगमध्ये दुबे ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
चकमकीत दुबे ठार झाल्याचा दावा
बर्राजवळ एसटीएफच्या गाडीला अपघात होवून गाडी उलटताच आरोपी दुबेने पोलिसांकडील शस्त्र पळवण्याचा प्रयत्न केला व या झटापटीत पोलिस कर्मचारी जखमी झाला. पोलिसांनी त्याला सरेंडर करण्यास सांगूनही तो शरण न झाल्याने चकमकीत विकास दुबे मारला गेला. तत्पूर्वी जखमी अवस्थेत कानपूरच्या हॅलट रुग्णालयात आणले असता तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

