यावल तालुक्यात महिलेसह तरुणासह सर्पदंश
यावल : शेत शिवारात काम करताना 40 वर्षीय महिलेसह शहरातील 32 वर्षीय तरुणास सर्पदंश झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. विरावली, ता.यावल येथील संगीताबाई सदाशीव पाटील (40) या गुरूवारी शेतात काम करत असताना त्यांच्या डाव्या हाताच्या बोटाला सर्पदंश झाला तर यावल शहरातील बाबुजीपूरा भागातील केळी कामगार शेख अजहर शेख खलील यास शुक्रवारी नावरेे शिवारात केळीच्या शेतात डाव्या पायाला सर्पदंश झाले. दोघांवर यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला, डॉ.प्रल्हाद पवार, अधिपरीचारीका नेपाली भोळे, आरती कोल्हे, सुमन राऊत आदींनी उपचार केले.

