साकळी गावात व परीसरात चालणार्या केळी वेफर भट्ट्या बंद करण्याची मागणी
यावल : तालुक्यातील साकळी गावासह परीसरात केळी वेेफरच्या चालणार्या भट्टींमुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती असून या भट्ट्या बंद करण्याची मागणी यावल पोलिसात निवेदनाद्वारे करण्यात आली.
साकळी, ता.यावल हेे गाव कोरोनाचे हॉटस्पॉट ठरताना दिसत असून गावासह परीसरात विविध ठिकाणी केळी वेफर करीता भट्टी लावली जाते. यात पाम तेलाचा वापर होतो तसेेच मोठ्या प्रमाणात धुर या भागात पसरत असल्यान संबधीतांवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन यावल पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांना साकळी गावातील शामलाल वडर, लक्ष्मण ठोसरे, मनोज मोरे, संतोष सोनवणे, जितेंद्र जंजाळे, नाना जंजाळे, संतोष जंजाळे आदीनी दिले.

