अंजाळे गावात आरोग्य विभागाकडून गावात नागरीकांची आरोग्य तपासणी


यावल : तालुक्यातील अंजाळे गावात कोरोना विषाणुचे रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागाकडू गावात नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. तसेच प्रतिबंधीत क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबातील सदस्याची माहिती घेतली जावुन त्यांची नोंद केली जात आहेे. अंजाळे, ता.यावल गावात कोरोनाचेे रुग्ण आढळल्याने काही भाग हा प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला असून या भागातील रस्ते बंद करण्यात आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर सतर्कता म्हणून या भागातील प्रत्येक कुटुंबाचेे सर्वेक्षण अंजाळे येथील आरोग्य उप केंद्रामार्फत गावातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यामार्फत करण्यात येत आहे. यासाठी ग्रामपंचायत सरपंच मनीषा कैलास सपकाळे, आरोग्य सेवक जे.एन.सपकाळे, व्ही.एल.पाटील, ग्रामसेवक सुनील निकम, आशा सेेविका छाया बादशहा, सरला सपकाळे, कुसुम पाटील, अंगणवाडी सेविका भारती सपकाळे, कूसुम सपकाळे, शकुंतला पाटील, मदतनीस जया सपकाळे, अलका बादशहा, दुर्गा सपकाळे, संध्या पाटील, जे.एन.सपकाळे आदी परीश्रम घेत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !