माजी पर्यटन मंत्र्यांनी ऑनलाईन केले मार्गदर्शन


राज्य शासनाच्या कारभारावर उठवली टिकेची झोड

रावेर : रावेर-यावल विधानसभा क्षेत्र भारतीय जनता पार्टीच्या वतीने गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता वर्चुअल सभेचे (ऑनलाईन सभा) आयोजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या प्रथम वर्षर्पूर्ती निमित्त रावेर-यावल विधानसभा मतदार संघाची ऑनलाइन सभा झाली. सभेसाठी माजी पर्यटन मंत्री तथा दोंडाईचा येथील आमदार जयकुमार रावल यांनी मार्गदर्शन केले. जयकुमार रावल यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष स्व.हरिभाऊ जावळे यांना श्रद्धांजली वाहून सभेला सुरवात केली.

राज्य शासनाच्या कारभारावर टिकेची झोड
रावल यांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरत वादळात केळी पिकाचे नुकसान झाल्याने त्याची नुकसान भरपाई मिळण्याबाबत न झालेली कारवाई, अवाजवी वीज बिलांमुळे होणारा मनस्ताप सोडवण्यासह कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर राज्य सरकार निष्क्रिय असल्याचे ते म्हणाले. ऑनलाईन सभेमध्ये प्रदेश भाजपच्या व रावेर लोकसभा क्षेत्राच्या खासदार रक्षा खडसे, विभाग संघटन मंत्री अ‍ॅड.किशोर काळकर, जिल्हा संयोजक नवलसिंग राजपूत, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, जि.प.अध्यक्ष रंजना पाटील, रावेर लोकसभा संयोजक नंदकिशोर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.मिलिंद वायकोळे, भाजप जिल्हा सरचिटणीस हर्षल महाजन आदी सहभागी झाले. ऑनलाइन सभेचे नियोजन भाजपा रावेर तालुकाध्यक्ष राजन लासुरकर यांनी केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !