भुसावळात लॉकडाऊनचे उल्लंघण : सात दुकानदारांवर कारवाई


मास्क न लावणार्‍या पाच नागरीकांनाही दंड : 56 हजार 500 रुपयांचा दंड वसुल

भुसावळ : कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी भुसावळा 7 ते 13 दरम्यान लॉकडाऊन जाहीर करून नियम धाब्यावर बसवत काही दुकानदार दुकाने उघडी ठेवत असल्याने अशा दुकानदारांवर कारवाई केली जात आहे. रविवारीदेखील पलिकेच्या सात दुकानदारांसह मास्क न लावणार्‍या पाच नागरीकांवर कारवाई करीत एकूण 56 हजार 500 रुपयांचा दंड वसुल केला. शहरातील अरीहंत प्रोव्हीजन (आनंद नगर), बिलाल किराणा (मोहम्मदिया नगर), आर.आर.एंटरप्रायजेस (पूजा कॉम्प्लेक्स जवळ), मधु डेअरी (विठ्ठल मंदीर वॉर्ड), इंदौर गॅरेज (जामनेर रोड) या दुकानांच्या संचालकांकडून दंड वसुल करण्यात आला.

यांच्या पथकाने केली कारवाई
कारवाई करणार्‍या पथकात लेखापाल संजय बाणाईते, पंकज पन्हाळे, परवेज शेख, सुरज नारखेडे, चेतन पाटील, विशाल पाटील, किरण मनवाडे, अनिल मनवाडे, राजेश पाटील, गोपाल पाली, योगेश वाणी, स्वप्निल भोळे, मयुर भोई, पोलीस कर्मचारी दीपक शिंदे, कॉन्स्टेबल चारूदत्त पाटील, किशोर पाटील आदींनी ही कारवाई केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !