भुसावळकरांना दिलासा : लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ नाही


भुसावळात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची माहिती : कोरोनाबाबत घेतला आढावा

भुसावळ : कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी 7 ते 13 दरम्यान भुसावळात लॉकडाऊन जाहीर केले होते मात्र पुन्हा 14 पासून लॉकडाऊन वाढवण्यात येणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी येथे दिली. कोरोनाबाबत आढावा घेण्यासाठी त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकार्‍यांची बैठक घेतली.

मृत्यू दर नियंत्रणात आणण्याला प्राधान्य
जिल्हाधिकारी म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली असून आता कोरोनाच्या अ‍ॅक्टीव्ह केस नियंत्रणात आणण्यावर प्रशासनाचा भर असून यापुढे अ‍ॅन्टीजन कीटचा वापर करून टेस्ट करण्यात येतील. भुसावळात रुग्णांची संख्या वाढत असलीतरी लवकरच रुग्ण डिटेक्ट होत असून त्यांना कोरोनातून बाहेर काढण्यासह मृत्यू दर नियंत्रणात आणण्याला आता प्राधान्य राहणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !