भाजी विक्रेत्यांसह कामगार महिलांना फेसमास्कसह सॅनिटायझर वाटप


इनरव्हील क्लब ऑफ भुसावळचा स्तुत्य उपक्रम

भुसावळ : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ भुसावळतर्फे शहरातील भाजी विक्रेत्या महिलांसह कामगार महिलांना आणि स्त्रियांना फेसमास्क, सॅनीटायझर, विटामिन डी टॅबलेट आणि किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. आपण कार्य करत असताना आपली स्वतःची काळजी कशी घ्यावी? आपली प्रतिकार शक्ती कशी वाढवावी ? याबद्दल उपयुक्त अशा टीप्स आरती चौधरी यांनी उपस्थित महिलांना दिल्या. यावेळी क्लब अध्यक्ष शीतल भराडे, सचिव रुचिका शर्मा, शशी लाहोटी, आरती चौधरी या उपस्थित होत्या. सोशल डिस्टन्सचे पालन करून हा उपक्रमर राबवण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !