चिनावल-कुंभारखेडा रस्त्याच्या दुरुस्तीने वाहनधारकांना दिलासा
राष्ट्रवादी कार्याध्यक्ष विलास ताठे यांच्या पाठपुराव्याला आले यश
रावेर : गेल्या अनेक दिवसांपासून चिनावल-कुंभारखेडा रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांमधून तीव्र नाराजीचा सूर व्यक्त होत होता. रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष विलास ताठे यांनी दिला होता. इशार्याची दखल घेत संबंधित विभागाने रस्ता दुरुस्तीला सुरुवात केल्याने समाधान व्यक्त होत आहे.
रस्त्यामुळे वाहनधारक झाले होते त्रस्त
रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनधारकांना वाहन चालवणे डोकेदुखी ठरत होते. वाघोदा, चिनावल, कुंभारखेडा या गावांना जोडणारा एकमेव दुवा असलेला रस्ता असल्याने शिवाय परीसरात केळीची मोठी बाजारपेठ असल्याने दररोज 40 ते 50 ट्रक केळीची वाहतूक होते शिवाय अवजड वाहनामुळे रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था निर्माण झाल्याने संताप व्यक्त होत होता. दरम्यान वाहनधारकांचा वाढता रस्ता व झालेल्या तक्रारींची दखल घेत संबंधित विभागाने रस्त्याची डागडूजी सुरू झाल्याने रावेर तालुका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष विलास ताठे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

