लॉकडाऊनचे उल्लंघण : यावलमध्ये 16 भाजी विक्रेत्यांवर गुन्हा
यावल : शहरातील भाजीपाला विक्रेत्यांना एका ठिकाणी न थांबता फिरून भाजीपाल विक्री करण्याच्या सूचना दिल्यानंतर सूचनांचे पालन न केल्याप्रकरणी खिर्नीपुरा व बाजारपेठ आदी गर्दीच्या ठिकाणी एकत्र जमून वाहतुकीस अडथळा निर्माण करीत कोरोना संक्रमणास चालना दिल्याने 16 फळ-भाजीपाला विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
यांच्याविरुद्ध दाखल झाला गुन्हा
यावल शहरातील खिर्निपुरा चौकात रोडचे बाजूला व मेन गल्लीत सोशल डिस्टन्सिंग न पाळता तसेच तोंडाला मास्क न बांधता शेख नसीम शेख युनूस, शेख रमजान शेख उस्मान, ईस्माईल शेख उस्मान, शेख जावेद शेख गुलाब, जमील शहा, रईस शेख युनूस, मधुकर पोपट बारी (आसाराम नगर), भोला इब्राहीम पटेल (देशपांडे गल्ली), रवींद्र भालचंद्र चौधरी (भजे गल्ली), अमृत गिरधर बारी (देशमुख गल्ली), संगीता राजेंद्र बारी (बारी वाडा), संगीता विजय बारी (बारी वाडा), प्रतीक पटेल (विरार नगर), योगेश देविदास बारी (बारीवाडा), मयूर अरुण बारी (बारीवाडा), शेख नावेद अब्दुल मजीद (खिर्णिपुरा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत यावल पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे व पोलीस हेड कॉन्स्टेबल मुजफ्फर खान असलम खान, राहुल चौधरी आदींना गस्तीदरम्यान फळ व भाजीपाला विक्रेत्यांनी नियमांचे उल्लंघण केल्याचे सोमवारी दुपारी आढळल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

