दहिगावकरांनी उत्स्फूर्तपणे पाळला कडकडीत बंद


यावल : तालुक्यातील दहिगाव येथे वाढत्या कोरोनाबाधीतांची संख्या पाहता ग्रामपंचायत प्रशासनाने मंगळवारी व बुधवारी दोन दिवसीय कडकडीत बंद जाहीर केला आहे. पहिल्या दिवशी बंदला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गावात आतापर्यंत कोरोनाबाधीत रुग्णांची संख्याही 10 वर पोहोचली असून यात एका पॉझीटीव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या बंदला पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी यावलचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. त्यांना दहिगाव बिटचे पोलीस कर्मचारी गौरख पाटील, गावातील पोलीस पाटील संतोष पाटील, दहिगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच देविदास धांगो पाटील आदी परीश्रम घेत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !