‘व्हाईट लिली’ काव्य संग्रहातील कवितेचा मराठी द्वितीय भाषा अभ्यासक्रमात समावेश
यावल तहसीलदार जितेंद्र कुंवर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
यावल : यावल तहसीलदार जितेंद्र कुवर लिखीत ‘व्हाईट लिली’ या काव्य संग्रहातील ‘तू एकदा पूर्वेचा’ या कवितेचा समावेश स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांनी मराठी द्वितीय भाषा अभ्यासक्रमात केला आहे. यासाठी तहसीलदार कुंवर यांच्यावर राज्यातील कवी व लेखकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
2020-21 पासून अभ्यासक्रमात समावेश होणार
बी.ए., बी.कॉम. बी.एस्सी. पदवी द्वितीय वर्षाचे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2020/21 पासून अभ्यासात समाविष्ठ असणार आहे. तहसीलदार जितेंद्र कुंवर यांची ही कविता त्यांच्या ‘व्हाईट लिली’ या काव्यसंग्रहात समाविष्ट आहे. काव्यसंग्रह 2019 मध्ये ग्रंथाली प्रकाशन मुंबईने व्हाईट लिली हा काव्य संग्रह प्रकाशीत केला आहे. यावल तहसीलदार जितेंद्र कुंवर हे कवी व लेखक ही असून या पुढे ही ते आपल्या लेखणातुन आणखी काही ही काव्य करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
तहसीलदारांवर शुभेच्छांचा वर्षाव
अतिशय सोज्वळ शांत, निस्वार्थी स्वभावाचे व प्रशासनात कुठलीही कुचराई न करता पारदर्शी काम करणारे अधिकारी म्हणून जितेंद्र कुंवर यांची ओळख असून यावल तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यासह जळगाव जिल्ह्यात त्यांनी आपली आगळी-वेगळी ओळख निर्माण केली आहे. तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे यावल तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, विविध संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी पत्रकार व नागरीकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

