बोदवड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतांची आमदारांनी केली पाहणी


बोदवड : बोदवडसह परीरसरात सोमवारी रात्री अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान मुसळधार पाऊस झाल्याने तालुक्यातील सुरवाडे बु.॥ व सुरवाडे खुर्द व मानमोडी येथील शेतकर्‍यांची पिके जमीनदोस्त झाल्यानंतर मंगळवारी आमदार चंद्रकांत पाटील यांनी नुकसानीची पाहणी केली. दरम्यान, मुसळधार पावसामुळे शेतातील पाईप सुद्धा पाण्यात वाहिले तर एका शेतकर्‍याच्या बैलाचा मृत्यू ओढवला.

शेतकर्‍यांवर अस्मानी संकट
आधीच पावसाअभावी शेतकर्‍यांनी दुबार पेरणी केल्यानंतर शेतकर्‍यांवर संकट कोसळले असताच पुन्हा ढगफुटी प्रमाणे झालेल्या पावसामुळे शेतकर्‍यांवर पुन्हा संकट कोसळल्याने शासनाने त्वरीत पंचनामा करून शेतकर्‍यांना मदत करावी, अशी आपेक्षा आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे शेतकर्‍यांनी व्यक्त केली. मंगळवारी सकाळी नऊ वाजता तहसीलदार हेमंत पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. दिवसभरात सुमारे शंभरावर शेतकर्‍यांच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे करण्यात आले उर्वरीत पंचनामे लवकरच करून शासनाला अहवाल पाठवणार असल्याचे बोदवड तहसीलदार हेमंत पाटील म्हणाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !