संतांचे कार्य देशासह धर्माच्या हितासाठी
महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज : ब्रह्मलीन घनश्यामदास महाराजांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
फैजपूर : संताची विचारधारा वेगळी असली तरी त्यांचे कार्य देश आणि धर्मासाठी असते. संत जे जीवन जगतात ते लोक परोपकारी असल्य ानेते पूजनीय असतात. संत देश, धर्म, जनतेसाठी निरतंर कार्य करीत असतात, असे विचार महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी व्यक्त केले. सोमवारी खंडोबा देवस्थानात ब्रम्हलीन संत घनशामदास महाराज यांच्या व्दितीय पुण्यतिथी कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी श्रध्दांजली अर्पण केली असता ते बोलत होते. श्री खंडोबा देवस्थानचे महंत ब्रह्मलीन घनशामदासजी महाराज यांच्या व्दितीय पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजन करून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
प्रसंगी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, स्वामी भक्ती किशोर शास्त्री, आमदार शिरीष चौधरी, बापूजी संत गोपाल चैतन्य महाराज, महामंडलेश्वर पुरुषोत्तम दास महाराज, भरत महाराज (कुसुंबा), स्वरूपानंद महाराज, (डोंगरदे), एकनाथ महाराज यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. श्रद्धांजली कार्यक्रम कोरोना नियमांचे पालन करून पार पडला. सर्व संत महंत, आमदार शिरीष चौधरी, नरेंद्र नारखेडे यांनी मनोगत व्यक्त केले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
पांडुरंग सराफ, नरेंद्र नारखेडे, लीलाधर चौधरी, कमलाकर भंगाळे, डॉ. उमेश चौधरी, डॉ.सुनील पाटील, डॉ.नितीन महाजन, डॉ.गणेश भारंबे, प्राचार्य व्ही.आर.पाटील, प्राचार्य आर.एल.चौधरी, नगरसेवक केतन किरंगे, रवींद्र होले, राकेश जैन, सेवानिवृत्त प्राचार्य एस.एस.पाटील, भरत महाजन, किरण चौधरी, गोटू भारंबे, संजय तेली, सुरेश परदेशीं, चंदा भिरूड, लाला भिरूड, किरण बोरोले, सुरेश कोळंबे, गोटू परदेश यांची होती उपस्थिती होती.

