दहावीच्या सीबीएसई बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा शाळांकडून कायम


विद्यार्थ्यांप्रमाणेच विद्यार्थिनीही ठरल्या अव्वल

भुसावळ : दहावी सीबीएसई बोर्डाचा निकाल बुधवारी जाहीर झाल्यानंतर भुसावळ शहरासह परीसरातील अनेक शाळांचा निकाल शंभर टक्के तर काही शाळांचा निकाल 90 टक्के लागला. विद्यार्थ्यांप्रमाणे विद्यार्थिनींनी यशाचा आलेख कायम ठेवत परीक्षेत घवघवीत यश मिळवले. दरवर्षाप्रमाणे शहरातील अनेक शाळांनी यशाची परंपर कायम राखली.

सेंट्रल रेल्वे स्कूल
भुसावळ :
रेल्वे स्कूल भुसावळ येथील विद्यार्थ्यांनी दहावी सीबीएसई बोर्ड परीक्षेत यश संपादन केले. स्कूलमधून प्रथम पलक कुमारी (95.8), द्वितीय सानिया शाजी जोसेफ (94.6) आणि तृतीय क्रमांक आर्या गुप्ता (94.4) यांनी पटकाविला. सानिया शाजी जोसेफ या विद्यार्थिनीला गणित विषयात 100 पैकी 100 गुण मिळाले. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशा बद्दल डीआरएम विवेककुमार गुप्ता, एडीआरएम मनोजकुमार सिन्हा, सीनिअर डीपीओ एन. डी.गांगुर्डे, रेल्वे स्कूलचे प्राचार्य सतीश कुळकर्णी यांनी कौतूक केले.

डॉ. उल्हास पाटील स्कूलचा शंभर टक्के निकाल
भुसावळ :
शहरातील डॉ.उल्हास पाटील स्कूलचा निकाल 100 टक्के लागला. स्कूलमधून सुश्रृत संजय पाराशर व दीक्षा लक्ष्मण सूर्यवंशी या विद्यार्थ्यांनी 97 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. लोचन विकास जावळे (95.60), उन्नती अरुण जावळे (95.20), अनुश्री सोहम खैरनार (94.60), यशचंद्र महेंद्र सोनवणे (94.20), पूर्वा शिरीष जोशी (93.80), रसिका देवेंद्र जोशी (93.20), खुशी प्रकाश सूर्यवशी (92.60), सुष्टी हरीओम अग्रवाल (91.6), अंजली छगन रडे (91.60) उत्तीर्ण झाले. प्रथमेश संजय चौधरी याने गणितात 100 पैकी 100 गुण मिळवले. संस्थाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, संचालिका डॉ.केतकी पाटील, मुख्याध्यापिका अनघा पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले.

पोदारचा 100 टक्के निकाल
भुसावळ :
पोदार इंटरनॅशनल स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला. शाळेतून चेतन राजीव भावसार हा विद्यार्थी 97.4 घेऊन प्रथम तर द्वितीय कशिश नवीन अग्रवाल (95.8), तृतीय अथर्व अनिल संगवारने (95.4) आला. समर्थ चंदनकुमार पाटील (95.00), अनंत त्रिपाठी (94.2), श्रेया संजय जांभूलकर (94), अर्णव प्रशांत अग्रवाल, शीफा खान (93.8), ओजास्विनी राजेश्वर पाटील (92.8), रीया ओमप्रकाश फिरके (92.6), आदर्श उपेंद्र रथ (91.2) या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. संस्कृत विषयात चेतन भावसार, गणितात समर्थ पाटील तर संगणक विषयात अनंत त्रिपाठी, कशिश अग्रवाल, शीफा खान या विद्यार्थ्यांनी 100 गुणांपैकी 100 गुण प्राप्त केले. प्राचार्य विनयकुमार उपाध्याय, शाळेचे व्यवस्थापक रामदास कुलकर्णी, पोदार जम्बो किड्सच्या मुख्याध्यापिका मनीषा श्रुंगी आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

ताप्ती स्कूलचा 100 टक्के निकाल
भुसावळ :
शहरातील ताप्ती पब्लिक स्कूलचा 100 टक्के निकाल लागला. प्रथम प्रेरणा मिलिंद गायकवाड (98.6), द्वितीय अथर्व अनंत बेंडाळे (98.4), तृतीय गायत्री भुषण देशमुख (97) तर सृष्टी उज्वल महाजन (96.6), देवश्री किशोर पाटील (96.6), सात्विक सुनिल इंगळे (96.4), आशय अमित बाळापूरकर (95.6), ध्रुव उन्मेष पाटील (95.2), रीया मिलिंद पाटील (95.2), श्रावणी नितीन देशमुख (94.8), सेजल प्रवीण नेहेते (94.4), पूर्वेश प्रवीण फेगडे (94.4), गार्गी प्रकाश पाटील (94.2), करीष्मा बलराम दर्डा (93.6), कल्पेश अनिल इंगळे (93.4), हिमांशू प्रशांत धांडे (93), सुयश ज्ञानेश्वर करसाळे (92.4), आर्यन सतीश साखरे (92), निर्जला अरुण कुमार (91.8) टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सेक्रेटरी विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजय नाहाटा, मुख्याध्यापिका नीना कटलर यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !