चाळीसगावात लाचखोर वायरमनला एसीबीच्या कारवाईचा ‘शॉक’


पाच हजारांची लाच घेताना दोघे जाळ्यात : नाशिक एसीबीची कारवाई

चाळीसगाव : घरगुती वापराचे वीज कनेक्शन मिळण्यासाठी केलेल्या ऑनलाईन अर्जावरून कोटेशन काढून देण्याकरीता पाच हजारांची लाच घेताना वरीष्ठ तंत्रज्ञ संदीप हरी मुंडे (वासाडी, ता.कन्नड) व रोजंदारी कर्मचारी अजय संजय पाटील (29, करगाव, ता.चाळीसगाव) यांना नाशिक एसीबीच्या पथकाने गुरुवारी दुपारी एक वाजता रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई नाशिक एसीबीचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रभाकर निकम व पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, नाईक वैभव देशमुख, नितीन कराड, चालक हवालदार संतोष गांगुर्डे आदींच्या पथकाने केली. आरोपींनी चाळीसगावातील वीज कंपनीच्या कक्ष तीनमधील कार्यालयात लाच स्वीकारताच त्यांना दुपारी एक वाजता अटक करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !