भुसावळचे छायाचित्रकार श्याम गोविंदा अपघातातून बालंबाल बचावले
भुसावळ : भुसावळातील वरीष्ठ छायाचित्रकार श्याम गोविंदा हे छायाचित्रणाच्या कामासाठी सोलापूर जिल्ह्यात गेले असता ऑर्डरचे काम संपल्यानंतर ते चारचाकीने परतत असताना चारचाकी उलटली मात्र सुदैवाने या अपघातात श्याम गोविंदा हे बचावले आहेत. रोफळेक, ता. माढा, जि. सोलापूर येथे हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. छायाचित्रणाची ऑर्डर मिळाल्याने ते सोलापूर जिल्ह्यात गेले होते तर ऑर्डरचे काम झाल्यानंतर ते देवी दर्शनासाठी चारचाकीने गेले होते व दर्शनावरून परतत असतानाच चारचाकी रस्त्याखाली उलटली मात्र सुदैवाने या अपघातात त्यांना काहीही ईजा झाली नाही मात्र चारचाकीचे मोठे नुकसान झाले.

