बारावी परीक्षेत हिंदवी सोनार केंद्रीय विद्यालयातून प्रथम
वरणगाव : वरणगाव आयुध निर्माणीतील केंद्रीय विद्यालयातून हिंदवी नितीन सोनार हिने 95.08 टक्के गुण मिळवून केंद्रीय विद्यालयातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. ती मिल्ट्री सैनिक नितीन गोपाळ सोनार यांची कन्या असून दुसरा क्रमांक मोहित मौर्या (87.03), तिसरा क्रमांक मोरेश्वर मुलांडे (85.04) याने पटकावला.
गुणवंतांचा गौरव
प्राचार्य प्रा.राजेश पाटील, सी.बी.एस्सी प्रमुख गव्हाळे, अशोक सर यांच्यासह सर्व शिक्षक बंधूनी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले. केंद्रीय विद्यालयातून प्रथम क्रमांकाने आलेली हिंदवी नितीन सोनार ही वरणगाव येथील रहिवासी व माजी सैनिक किशोर गोपाळ सोनार यांची कन्या आहे. तिने मिळवलेल्या यशानंतर माजी नगराध्यक्ष सुनील काळे, मेजर किशोर सोनार, कमलाकर मराठे, शंकर पवार, संजय सोनार, हितेश चौधरी यांनी हिंदवी सोनारचा पेढा भरवून व हारपुष्प गुलाब देउन सत्कार केला.

