बोदवड तहसील आवारातून रेतीने भरलेले डंपर लांबवले


बोदवड : बोदवड तहसीलच्या आवारातून रेतीने भरलेले दोन डंपर लांबवल्याप्रकरणी बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 3 जुलै रोजी सायंकाळी सात वाजता ही घटना घडली. तलाठी निराज प्रकाश पाटील (33) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 3 जुलै रोजी सायंकाळी सात वाजता संशयीत आरोपी शेख अजीज शे.इब्राहीम (आव्हाना, ता.जिल्हा जळगाव) याने सात लाख सात हजार 690 रुपये किंमतीचे डंपर (जी.जे.21व्ही. 1622) लांबवले शिवाय त्यात सात हजार 690 रुपये किंमतीची दोन ब्रास रेतीदेखील होती शिवाय आरोपी गजानन रामदास भोई (भुसावळ) याने सात लाख सात हजार 690 रुपये किंमतीचे डंपर (एम.एच 19 वाय.4629) लांबवले व त्यातही सात हजार 690 रुपये किंमतीची दोन ब्रास रेतीदेखील होती. दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भाईदास मालचे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !