भुसावळात जलशुद्धीकरणात अडथळ्याने गढूळ पाणीपुरवठा
जल शुद्धीकरण केंद्रातील क्लोरीफाक्युलेटरची भिंत कोसळली
भुसावळ : शहराला दोन दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरीक संतप्त झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, पालिकेच्या तापी नगराजवळील जलशुद्धीकरण केंद्रातील जुन्या क्लोरीफाक्युरेटरची भिंत कोसळल्याने जलशुद्धीकरण करण्यात अडथळा येत आहे. या भिंतीचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत शहरात गढूळ पाणीपुरवठा होणार आहे शिवाय हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडण्यात आलेले असल्याने तापी नदीला पूर आल्याने गाळाचे प्रमाणही वाढल्याने अशुद्ध पाण्याची स्थिती उद्भवली आहे शिवाय शहरात विलंबाने व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरीकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

