दीपनगरातील संच क्रमांक चारमधून वीज निर्मितीला सुरुवात


भुसावळ : दीपनगरातील संच क्रमांक चारमधून गुरूवारी पहाटे पाच वाजता वीज निर्मितीला सुरूवात झाली असून तब्बल 115 दिवसांनी हा संच कार्यान्वीत झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात 23 मार्चपासून लॉकडाऊन झाल्याने औद्योगिक व व्यावसायीक क्षेत्रातून विजेची मागणी मोठ्या प्रमाणात घसरली. भुसावळ औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील दोन्ही संच बंद करण्यात आले होते मात्र आता अनलॉकनंतर राज्याची विजेची मागणी वाढत आहे. उद्योगधंदे व दुकानेही सुरु झाल्याने औद्योगिक व व्यावसायीक मागणीत वाढ झाली आहे. यामुळे आता महानिर्मिती प्रशासनाने 500 मेगावॅट स्थापीत क्षमतेचा संच क्रमांक चार कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. यानुसार बुधवारी रात्री 12 वाजता संच लाईटअप करुन गुरुवारी सकाळी पाच वाजता तो कार्यान्वित करण्यात आला. येथील संच इतिहासात प्रथमच इतक्या अधिक काळासाठी बंद राहिले होते. दरम्यान कामगार संघटनांनी याबाबत व्यवस्थापनाकडे संच कार्यान्वित करण्याची मागणी केली होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !