भुसावळात गावठी पिस्तुलासह आरोपी जाळ्यात
भुसावळ : शहरातील अयान कॉलनीतील रहिवासी मोहम्मद इस्माईल मोहम्मद आलम उर्फ सोनू याच्या घरातून जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गावठी पिस्तुल शनिवारी रात्री जप्त केले. ही कारवाई सहाय्यक फौजदार अशोक महाजन, हवालदार शरीफ काझी, युनूस शेख, किशोर राठोड, रंजीत जाधव आदींच्या पथकाने केली. शहरात गावठी पिस्तुल पकडण्याची पोलिसांनी मोहिम सुरू केली आहे.


