अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याला सुरुवात
अयोध्या : ऐतिहासिक राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल झाले असून त्यांनी प्रथम हनुमान गढीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. 29 वर्षानंतर प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी राम जन्मभूमी परिसरात दाखल झाले आहे. 1992 मध्ये त्यांनी रामाचे दर्शन घेतले होते, तेव्हा त्यांनी ज्यावेळी राम मंदिर होईल तेंव्हाच रामाचे दर्शन घेईल, अशी भीष्म प्रतिज्ञा केली होती. त्यानंतर तब्बल 29 वर्षानंतर ते राम जन्मभूमीत दाखल झाले आहेत. दरम्यान, अयोध्येत भूमिपूजन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. दरम्यान
असा आहे पंतप्रधानांचा दौरा
12.40 : राममंदिराची आधारशिला स्थापन करणार
01.10 : नृत्यगोपालदास वेदांती यांच्यासह ट्रस्ट कमिटीची भेट घेणार
02.05 : साकेल हेलिपॅडकडे रवाना होणार
02.20 : हेलिकॉप्टरने लखनऊकडे प्रस्थान करणार


अयोध्येत कडेकोट बंदोबस्त
अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमासाठी 175 संत, महंत व विविध धर्मांतील मान्यवर उपस्थित असून त्यांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण अयोध्या सील करण्यात आली आहे. मोदींच्या हस्ते भूमिपूजन होईपर्यंत अयोध्येत एसपीजी आणि एनएसजी जवानांचा बंदोबस्त लावण्यात आला असून कार्यक्रमात सहभागी होणार्यांचीही कसून तपासणी केली जात आहे.