शिरपूर केमिकल फॅक्टरी स्फोट : जलसंपदा मंत्र्यांनी केली पाहणी
शिरपूर : वाघाडी रस्त्यावरील केमिकल फॅक्टरीत शनिवारी सकाळी अचानक तीन रासायनिक टाक्यांचा स्फोट होवून तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला होता तर 72 कामगारांसह नागरीक जखमी झाले होते. या घटनेनंतर राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाकडून पुन्हा रविवारी शोध कार्य सुरू करण्यात आले. रविवारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी फॅक्टरीला भेट देवून पाहणी केली. यावेळी महाजन यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले की, या स्फोटाची चौकशी केली जाणार असून दोन रुग्णांना मुंबईला शस्त्रक्रियेसाठी हलवण्यात येणार असून या घटनेत दोन लोक बेपत्ता असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली असून त्यांचाही शोध सुरू असल्याचे ते म्हणाले. या घटनेसंदर्भात फॅक्टरी मालकावर गुन्हा दाखल झाल्याचे त्यांनी सांगत मुख्यमंत्र्यांनी मयतांच्या वारसांना पाच लाख जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केल्याचही सांगितले.