यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवारात इलेक्ट्रिक तोल काट्याचा शुभारंभ


यावल (मंगळवार, 25 ऑगस्ट 2026) : यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवारात इलेक्ट्रिक टोल काट्याचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खाजगी फंडातून काँक्रिटीकरण करून येथे इलेक्ट्रिकल तोल काटा नव्याने उभारण्यात आला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बाजार समितीच्या खाजगी फंडातून काँक्रिटीकरण करण्यात आले आणि इलेक्ट्रिक टोल काट्याचे नव्याने पुन्हा उभारणी करण्यात आली.



या तोलकाट्याचे लोकार्पण भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते वसंत भोसले, माजी सभापती हिरालाल चौधरी, विद्यमान सभापती उज्जैनसिंग राजपूत, माजी सभापती नारायण चौधरी, माजी सभापती मुन्ना पाटील, भाजपा गटनेत्या नंदा महाजन, जिल्हा परिषदचे माजी सदस्य हर्षल पाटील, शरद महाजन, प्रभाकर सोनवणे, रवींद्र पाटील, राकेश फेगडे यांच्याहस्ते करण्यात आले. दरम्यान, तोलकाटा शेतकर्‍यांसाठी खुला करण्यात आला. या कार्यक्रमात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक व मान्यवर उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !